Induction Programming 2022
Organiser: सौ. रेणुका गेज्जी मॅडम
Posted : 2022-08-25आज दि. २५ /०८/२०२२ रोजी, सिध्दार्थ पाॅलिटेक्निक जत, मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इन्डक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात कालकथित मा. आमदार, श्री. उमाजीराव सनमडीकर तथा आदरणीय काका यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रथम सेशन मध्ये, मा. श्री. विल्सन थाॅमस, प्राचार्य- सिध्दार्थ पब्लिक स्कूल, यांनी personality development या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सेशन मध्ये,मा. श्री. प्रल्हाद बोराडे, चिंच विसावा - शेगांव, यांनी Sustainable Environment या विषयावर मार्गदर्शन केले. तर तृतीय सेशन मध्ये,मा. श्री. विशाल चिपडे, विषय तज्ज्ञ, बी. रा. सी. - पंचायत समिती जत, यांनी Importance of character in education या विषयावर सुरेख मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. रेणुका गेज्जी मॅडम यांनी केले. सर्व वक्ते यांचा परिचय आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम प्राचार्य दशरथ वाघमारे यांनी केला. तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कु. स्नेहल वाघमारे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला मा. चेअरमन डॉ. कैलास सनमडीकर आणि डॉ. वैशाली सनमडीकर मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगीची काही क्षणचित्रे. धन्यवाद.