'एक पेड मेरे माँ के नाम'
Organiser: Mr. Babar Sir
Posted : 2024-08-22*सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये 'एक पेड मेरे माँ के नाम' कार्यक्रम संपन्न.* श्री. उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित, सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येते, महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण जत,यांच्या मार्फत 'एक पेड मेरे माँ के नाम' हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे. कारण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार सोडला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल, यात दुमत नाही.या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या परिसरात 200 झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण कार्यालयाचे श्री.सचिन कांबळे (वनरक्षक),श्री.प्रफुल्ल भोसले (वनपाल) उपस्थित होते.सचिन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले व अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच,प्रफुल्ल भोसले यांनी या उपक्रमाबाबत आपले विचार मांडताना पर्यावरण विषयक जागरुकता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. यावेळी कॉलेज च्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली ,नॉन अकॅडेमिक इन्चार्ज श्री.संजय बाबर,सर्व विभाग प्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी आणि विदयार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे, संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.