निर्भया पथकाचे मार्गदर्शन
Organiser: Mrs. Vaggoli R. G.
Posted : 2024-08-24**सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येते,निर्भया पथकाचे मार्गदर्शन* * जत पोलील स्टेशनं यांच्या निर्भया पथकाने श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित,सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येते,विद्यार्थी आणि विध्यार्थीनीच्या सुरक्षिततेसाठी विविध विषयावर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वयात येणाऱ्या मुलामुलींनी घ्यावायची काळजी,चांगला वाईट स्पर्श,पोक्सो कायदा,स्वसंरक्षण,कायदेविषयक माहिती,पोलीस स्टेशन ला दाखल होणारे गुन्हे,निर्भया पथकाचे ध्येय,उद्धिष्ट,तक्रार कुठे व कशी दयावी याची सविस्तर माहिती दिली.पोलीस,आईवडील,शिक्षक आपले संरक्षण करतात. पण प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा आपण एकटे असतो. अश्या वेळी आपण आपल्या सुरक्षिततेची काळजी आपणच घ्यावी. मुलांनी आईवडिलांपासून काही लपवू नये.मुलींच्या मनामनापर्यन्त पोहचणे व त्यांना बोलते करणे हा निर्भया पथकाचा उद्देश असून अन्याय सहन करू नका. टिंगल टवाळ्या करून छेड छाड केली जाते.अशा जर काही घटना घडल्यास मुलींनी सतर्क राहून तात्काळ 1091 डाईल करून माहिती दयावी.आम्ही आपणास ताबडतोब मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल केरबा चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांस पोलीस कॉन्स्टेबल श्री.अजित मदने, सौ.पार्वती चौगुले उपस्थित होते यावेळी कॉलेज च्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली,नॉन अकॅडेमिक इन्चार्ज श्री.संजय बाबर,विभाग प्रमुख-श्री.प्रकाश कारकल,श्री.करणसिंग रजपूत,कु.रुपाली पुजारी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी आणि विदयार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे, संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले