स्वागत समारंभ आणि शिक्षक दिन
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2024-09-05*सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये स्वागत समारंभ आणि शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न* श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये प्रथम व द्वितीय वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि शिक्षक दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्री.अजयकुमार नष्टे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजयकुमार नष्टे म्हणाले आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे,आयुष्यात विनम्रता कधीच विसरू नका,विनम्रता हा तुमचा अलंकार आहे.त्यांनी आपण उपविभागीय अधिकारी या पदावर पोहचण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास, त्यांनी केलेली मेहनत विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी चे चेअरमन सौ.डॉ.वैशाली सनमडीकर आणि संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर उपस्थित होते. यावेळी डॉ. कैलास सनमडीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण त्यांच्या गावाजवळ मिळावे व त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्या या उद्देश्याने सिद्धार्थ पॉलीटेकनिक कॉलेज सुरु केले. संस्था सदैव्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील असेल.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी,त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात कॉलेज संस्था नेहमी मार्गदर्शन मदत करीत असणार आहे.त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असेही आवाहन केले. या कार्यक्रमाचे नियोजन द्वितीय आणि तृतीय वर्ष्यातील विद्यार्थ्यांनी केले. यावेळी एम. एस.बी.टी.ई.बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.जोस्त्ना कोडग यांनी केले.आभार प्रदर्शन श्री.प्रकाश कारकल यांनी केले. या कार्यक्रमास कॉलेज च्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली,सर्व विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.