Career Guidance
Organiser: Mr. Karkal P. M.
Posted : 2024-11-14*करियर कसे निवडावे ? कु. विद्या कांबळे* 💐 श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये विद्यार्थ्यांसाठी **व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम**घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे व्यक्ते म्हणून MKCL चे मार्केटिंग अधिकारी कु.विद्या कांबळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्या कांबळे म्हणाल्या आपल्या जीवनामध्ये करियर ला खूप महत्व आहे.आपली आवड आणि ध्येय ठरवून ते पूर्ण करणे म्हणजेच आपले करियर घडवणे होय.प्रत्येकानी आपले करियर घडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे.तसेच त्यांनी MKCL च्या विविध कोर्स बद्दलही माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी कॉलेज च्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली, नॉन अकेडेमिक इन्चार्ज श्री.संजय बाबर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. राहुल कोळेकर यांने केले.आभार प्रदर्शन श्री.प्रकाश कारकल यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.सौ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री. भारत साबळे,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी सर्व विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.💐