सिद्धार्थ पॉलीटेकनिक क्रीडा स्पर्धा
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-01-07*सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये क्रीडा स्पर्धाना सुरुवात* श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येथे आज रोजी क्रीडा स्पर्धाची सुरुवात झाली. जत तालुक्याचे भाग्यविधाते कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर (काका) यांनी तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनियरिंगचे शिक्षण मिळावे म्ह्णून 2009 साली डिप्लोमा कॉलेज ची सुरुवात केली.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे. यासाठीच प्रत्येक वर्षी स्पर्धा घेण्यात येतात.यावेळी शैक्षणिक वर्ष 2024/25 साठी तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.क्रीडा स्पर्धाचे उदघाटन सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ,सनमडी संस्थेचे संचालक श्री.विशाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कमल इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य श्री.अमोल वाघमोडे,ऍडमिन श्री.संतोष कांबळे हे ही उपस्थित होते. यावेळी जाधव सर म्हणाले खेळ हा विद्यार्थ्यांच्या वाढीचा आणि विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते मानसिक आरोग्य आणि शरीराच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या विकासास मदत करतात. खेळ आणि खेळांमध्ये सहभाग घेऊन, विद्यार्थ्याला विविध कौशल्ये, अनुभव आणि आत्मविश्वास प्राप्त होतो जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात.खेळामुळे शिस्त,परिश्रम,संघभावना,नेतृत्व यासारखे गुण वाढीस मिळतात.या उदघाटन प्रसंगी कॉलेज चे प्राचार्या सौ.वागोली आर.जी,नॉन अकेडिमिक इन्चार्ज श्री.संजय बाबर,स्पोर्ट्स इन्चार्ज श्री.हरीश साळुंखे उपस्थित होते.या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.सौ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच विभागप्रमुख-श्री.प्रकाश कारकल,श्री.करण रजपूत,कु. रुपाली पुजारी,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर स्टाफ, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.