सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक कार्यक्रम संपन्न
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-01-11श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित, सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येथे आज "वार्षिक क्रीडास्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रम"घेण्यात आला. दि.-07/01/2025 ते दि.10/01/2025 पर्यत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यामध्ये क्रिकेट,हॉलिबॉल, कब्बड्डी,खो-खो,गोलांफेक, थाळीफेक,भालाफेक,रनिंग इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेमध्ये विजेता संघाना पारितोषिक देण्यासाठी"वार्षिक क्रीडास्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रम" घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.ज्ञानोबा बंडगर (उपकार्यकारी अभियंता,MSEDCL सबडिव्हिजन,जत ) हे लाभले होते.प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.बंडगर सर म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकास ही होणे महत्वाचा आहे. यासाठी सर्वांनी खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे. जिद्द,चिकाटी कायम असली पाहिजे. यावेळी डॉ.कैलास सनमडीकर यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते विजेता संघास,विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमास प्राचार्या सौ.वागोली रेणुका,नॉन अकॅडेमीक इन्चार्ज श्री.बाबर संजय ,स्पोर्ट्स इन्चार्ज श्री.साळुंखे हरीश, विभाग प्रमुख- श्री.कारकल प्रकाश,श्री.रजपूत करण,कु.पुजारी रुपाली,शिक्षक-शिक्षेकेत्तर सेवक,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांस संस्थेचे चेअरमन डॉ. सौ.वैशाली सनमडीकर संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रणाली कदम आणि कु.अक्षदा ओलेकर यांनी केले. आभार श्री.प्रकाश कारकल यांनी मानले.💐💐