*सिद्धार्थ पॉलीटेकनिक ची राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्यास भेट*
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-01-18डिप्लोमा इंजिनियरिंग मधील अभ्यासक्रमामध्ये वर्गातील शिक्षणाबरोबरच औद्योगिक क्षेत्र भेट ही तितकेच महत्वाचे आहे.या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना बाजारातील वर्तमान ट्रेंड, उद्योगाच्या भविष्यातील परिस्थिती आणि उद्योगात लागू होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळू शकते.यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्कस्टेशन्स,प्लांट्स,मशीन्स, सिस्टीम्स,असेंबली लाईन्स पाहण्याची आणि अनुभवण्याची आणि उच्च प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची ही संधी मिळू शकते . यासाठीच सिद्धार्थ पॉलीटेकनिक येते विद्यार्थ्यांना या औद्योगिक क्षेत्र भेटीचे प्रत्येक वर्षी नियोजन केले जाते. आज दि. 18-01-2025 रोजी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी जत येथील 'राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना लि.तिप्पेहल्ली जत ' येथे भेट दिली.तेथील यंत्रसामुग्री,साखर तयार होण्याची प्रकिया याबाबत सविस्तर माहिती कारखान्याचे प्रमुख इंजिनिअर श्री.सुदाम पाटील,प्रमुख केमिस्ट श्री.नंदकिशोर जगताप,हेड टाईम कीपर श्री.श्रीनिवास कुंभार यांनी दिली. तसेच श्री.अंबाबाई मंदिर येथे ही भेट देऊन तिथे स्वछता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. वैशाली सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर,कॉलेजच्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली,नॉन अकेडेमिक इन्चार्ज श्री.संजय बाबर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. यावेळी विभागप्रमुख - श्री. प्रकाश कारकल,श्री.हरीश साळुंखे,श्री.करण रजपूत,कु. रुपाली पुजारी,शिक्षक -श्री.सौरभ शिंदे,कु.वर्षा जाधव उपस्थित होते. तसेच बस ड्राइवर -श्री.अरुण जाधव,श्री.आप्पा माळी, शिपाई समाधान शिवशरण यांचे ही विशेष सहकार्य लाभले. 💐