
डिप्लोमा पदविका झोनल स्पर्धेमध्ये सिद्धार्थ पॉलीटेकनिक चे घववीत यश.
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-02-01MSBTE mumbai आंतर पदवीका अभियांत्रिकी क्रीडा संघटना यांच्या वतीने सर्व पॉलीटेकनिक कॉलेजसाठी प्रत्येक वर्षी क्रीडामहोत्सव आयोजित केला जातो. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2024/25 चे क्रीडा स्पर्धा दि.20 जाने. ते 2 फेब्रु.2025 पर्यंत घेण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे पुणे विभागाअंतर्गत B2 Zone Zonal स्पोर्ट्स स्पर्धे अंतर्गत संजय भोकरे पॉली.मिरज,वालचंद कॉलेज सांगली,नानासाहेब महाडिक पेठ,आर.आय.टी. इस्लामपूर,पि.व्ही.पी.आय.टी.पॉली.बुधगांव,एम.डी.जाधव भोसे, लट्टे पॉली.सांगली यासर्व ठिकाणी कब्बडी,होलीबॉल,क्रिकेट,खो -खो,फुटबॉल,बॅडमिंटन, कुस्ती,अथलेटिक या क्रीडास्पर्धा घेण्यात येतात. आज लट्टे पॉली.सांगली यांनी नव कृष्णा वॅली कुपवाड येथील ग्राउंड येते आयोजित करण्यात आलेल्या पुरुष अथलेटीक आणि खो खो च्या आज स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत मधील *प्रथम वर्ष्यातील अनिरुद्ध शिखरे याने लॉन्ग जॅम्प मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागातील लक्ष्मीकांत चौगुले याने 400 मिटर रनिंग मध्ये द्वितीय क्रमांक*तसेच तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील करण राठोड याने 800 मिटर रनिंग मध्ये तृतीय क्रमांक पटकावला याबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर,कॉलेजच्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली,नॉन अकेडेमिक इन्चार्ज श्री.संजय बाबर,स्पोर्ट्स इन्चार्ज श्री.हरीश साळुंखे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुणे येथे होणाऱ्या Inter Zonal स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पब्लिक स्कूल चे प्राचार्य श्री.के श्यामसुंदर,बस प्रमुख श्री.अमोल मराठे यांनीही सहकार्य केले. यावेळी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट चे विभागप्रमुख श्री.प्रकाश कारकल,कु.रुपाली पुजारी, शिक्षक श्री.सौरभ शिंदे,कु.वर्षा जाधव उपस्थित होते. त्यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या स्पर्धेसाठी वाहन चालक श्री.पिंटू कदम,श्री.बाबासो माळी यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले.