
निर्भया पथक
Organiser: Institute
Posted : 2025-12-30श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन संचलित सिद्धार्थ पॉलिटेक्निक जत येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी, प्राचार्य मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलीस स्टेशन निर्भया पथक चे कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमासाठी निर्भया पथकाचे पदाधिकारी पोलीस कॉन्स्टेबल श्री अजित मदने आणि चौगुले मॅडम यांचे उपस्थिती मध्ये सिद्धार्थ पॉलिटेक्निक जत मध्ये निर्भया पथकाचे कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमांमध्ये निर्भया पथकाचे पदाधिकारी चौगुले मॅडम यांनी प्रथम वर्षीय व थेट द्वितीय वर्षीय विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना सर्व कायद्या व सुव्यवस्थेबद्दलचे माहिती दिले आणि पोलीस डिपार्टमेंट हा विद्यार्थ्यांचा चांगल्या भविष्य घडवण्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे ह्या या गोष्टीचा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण केले आणि आपल्या जत तालुका व आजूबाजूच्या परिसरामध्ये होत असलेला चुकीच्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या जीवनावर कसं परिणाम करू शकतो या सर्व गोष्टी पासून विद्यार्थ्यांनी कसं सांभाळून राहिला पाहिजे आणि कोणत्याही मुलांनी कोणत्याही मुलीचा छेड काढू नये आणि कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन मुलींसोबत करू नये सर्व विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच या संदर्भातील माहिती दिले सर्व मुलींना आवर्जून आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी कराटी शिकणं गरजेचं आहे आणि प्रत्येक मुलींनी कराटे शिकायला पाहिजे अशा गोष्टी चौगुले मॅडम यांनी सांगितले तसेच अजित मदने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना मुलांनी मोटरसायकलवर कॉलेजला येत असताना व्यवस्थितपणे यायला पाहिजे मोटरसायकलवर दोन विद्यार्थीच बसून यावेत ट्रिपल सीट मध्ये कॉलेजला येऊ नका आणि रोड मध्ये आपण हेल्मेट चा वापर करायला पाहिजे व्यवस्थित समाजामध्ये चांगलं नागरिक होण्यासाठी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा पोलीस केसेस नसायला पाहिजे म्हणून आपण समाजामध्ये व्यवस्थित राहणे गरजेचे आहे या सर्व बाबींचा खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ह्या कार्यक्रम पूर्ण होण्यामागे कॉलेजचे प्राचार्य मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध राहणं खूप महत्त्वाचे आहे ह्या गोष्टीवर प्राचार्य मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्रथम व थेट द्वितीय वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशालीताई सनमडीकर मॅडम,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे सर,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.!!🙏💐🙏
More Images

