SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



SPORTS
Organiser: Institute
Posted : 2026-01-22

सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये क्रीडा स्पर्धाना सुरुवात श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येथे आज रोजी क्रीडा स्पर्धाची सुरुवात झाली. जत तालुक्याचे भाग्यविधाते कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर (काका) यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनियरिंगचे शिक्षण मिळावे म्हणून 2009 साली डिप्लोमा कॉलेज ची सुरुवात केली.विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाबरोबरच मैदानी खेळाचे ही शिक्षण मिळायला हवे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे.यासाठीच प्रत्येक वर्षी स्पर्धा घेण्यात येतात.यावेळी शैक्षणिक वर्ष 2025/26 साठी तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.क्रीडा स्पर्धाचे उदघाटन सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ,सनमडी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री.विशाल जाधव आणि सिद्धार्थ पब्लिक स्कूल चे प्राचार्य के.श्यामसुंदर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाधव सर म्हणाले सांघिक आणि सहकार्याची भावना वाढीसाठी क्रीडास्पर्धा महत्वाच्या असतात.खेळामुळे शिस्त,परिश्रम,संघभावना,नेतृत्व यासारखे गुण वाढीस मिळतात. के.श्यामसुंदर यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या उदघाटन प्रसंगी कॉलेज चे प्राचार्या सौ.रेणुका वागोली,नॉन अकेडिमिक इन्चार्ज श्री.संजय बाबर,स्पोर्ट्स इन्चार्ज श्री.इराप्पा पुजारी उपस्थित होते.या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.सौ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर, चेअरमन श्री.भारत साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच विभागप्रमुख-श्री.हरीश साळुंखे,श्री.प्रकाश कारकल,श्री.करण रजपूत,श्री.सौरभ शिंदे,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर स्टाफ, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

More Images