
सिद्धार्थ पॉलिटेक्निकमध्ये राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव
Organiser: Institute
Posted : 2026-02-18सिद्धार्थ पॉलिटेक्निकमध्ये राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव उत्साहात ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग संकेत टाइम्स जत : सिद्धार्थ पॉलिटेक्निक जत येथे राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन औद्योगिक प्रायोजकांच्या प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याला चालना देण्यासाठी यंत्रमानव शर्यत, प्रकल्प संकल्पना सादरीकरण, मिनी प्रकल्प सादरीकरण, प्रश्नमंजुषा, संगणक कार्यक्रम लेखन स्पर्धा, टायपिंग स्पर्धा, बलून टॉवर स्पर्धा तसेच संगणक सहाय्यित आराखडा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तंत्रशिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये राज्यस्तरावर उद्योगक्षेत्रात कौशल्य वाढवणे हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या महोत्सवात अशोक माने पॉलिटेक्निक, शिवाजी पॉलिटेक्निक, श्री तासगाव विद्यापीठ तसेच सिद्धार्थ पॉलिटेक्निक जत येथील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सांगली, मिरज स्टील जत, विक्टरी विंग वाहन सेवा केंद्र जत, यश संगणक इन्फोकॉम, श्री साईसाईकृपा इंडस्ट्रीज संस्था जत, सुपरट्रान्स विद्युत सेवा जत, विनायक विद्युत सेवा जत, दत्त संगणक जत, श्री इन्फोटेक व अर्थ टेक्नोलॉजी संस्था जत, मंजुनाथ इन्फोटेक जत, श्री सोलापुरे सर संगणक मार्गदर्शन संस्था जत, प्रोटेक सिस्टिम्स कंपनी सांगली, श्रेणी संगणक इन्फोकॉम आदी संस्थांचे प्रायोजक लाभले.


