SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



Induction Program
Organiser: Institute
Posted : 2026-07-29

सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश स्वागत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या रेणुका वाघोली या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय नरळे, विभागप्रमुख (यांत्रिकी अभियांत्रिकी), फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, सांगोला हे होते. प्राचार्या सौ. वाघोली यांनी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत करून संस्थेच्या शैक्षणिक परंपरा, आधुनिक सुविधा, प्रयोगशाळा, प्रशिक्षण व प्लेसमेंटच्या संधी यांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री. नरळे यांनी विद्यार्थ्यांना अभियंता म्हणून यशस्वी होण्यासाठी शिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास, तांत्रिक कौशल्य, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच महाविद्यालयीन जीवनातील प्रत्येक संधीचा लाभ घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा प्रवेश स्वागत कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. वैशाली सनमडीकर, संस्थेचे व्हा. चेअरमन विशाल जाधव, संस्थेचे चेअरमन भारत साबळे, सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

More Images