
Industry Expert Lecture
Organiser: Institute
Posted : 2026-07-30सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत येथे संगणक व यांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने इंडस्ट्री एक्स्पर्ट लेक्चर उत्साहात संपन्न जत, दि. ३० जुलै २०२६ : सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत येथील संगणक विभाग व यांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्री एक्स्पर्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी श्री. ओ. आर. गायकवाड यांनी प्रमुख उद्योग तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहून आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान, उद्योगक्षेत्रातील नवीन संधी, आवश्यक तांत्रिक कौशल्ये, रोजगाराच्या संधी तसेच उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. आर. जी. वागोली या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन संगणक विभागप्रमुख श्री. के. बी. राजपूत तसेच यांत्रिकी विभागप्रमुख श्री. एस. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही विभागातील सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करून त्यांना करिअर नियोजनासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची प्रत्यक्ष माहिती मिळाली असून त्यांच्या तांत्रिक ज्ञानात व व्यावसायिक कौशल्यांमध्ये निश्चितच भर पडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



