
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती
Organiser: Institute
Posted : 2026-08-01सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी जत, दि. १ ऑगस्ट : सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेणुका वाघोली यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्यांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि श्रमिक, वंचित व उपेक्षित समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, समता आणि मानवतेची मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.विशाल जाधव,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.!!🙏💐🙏
More Images

