SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षाची (WGRC) बैठक
Organiser: Institute
Posted : 2026-08-13

महाविद्यालयाचे नाव: सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत शैक्षणिक वर्ष: २०२६–२७ बैठकीची तारीख:13-8-2026 वेळ:3pm ते 4pm दिनांक 13-8-26 रोजी सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षाची (WGRC) बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ वाघोली मॅडम उपस्थित होते. बैठकीस कक्षाचे समन्वयक, सदस्य तसेच विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस समन्वयकांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर महिला तक्रार निवारण कक्षाची उद्दिष्टे, कार्ये व जबाबदाऱ्या याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी तसेच महाविद्यालय परिसरातील सुरक्षितता याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींनी त्यांच्या समस्या व तक्रारी योग्य माध्यमातून कक्षाकडे मांडाव्यात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर,व्हा.चेअरमन श्री. विशाल जाधव,संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. यावेळी सर्व महिला शिक्षिका आणि विद्यार्थीनी उपस्थित होते.

More Images